शासकीय अधिकाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत.Appointment of employee.
शासन परिपत्रक :
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना याद्वारे असे सूचित करण्यात येते की, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना, संबंधित शासकीय अधिकाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
तथापि, अशी नेमणूक करणे अपरिहार्य असल्यास, अशा प्रकरणी शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीएफआर १२२१/प्र.क्र.६१/का.१३ दि. १२ जुलै, २०२१ अन्वये दिलेल्या सूचना विचारात घेण्यात याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१०९१४१६३१२९३९०७ असा आहे.
0 Comments