महागाई भत्ता वाढला..!राज्य शासनाचा मोठा निर्णय..!अखिल भरतील सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 3% वाढ..!DA मिळणार 31%।। DA Increased by 3%
▶️महागाई भत्ता Dearness allowance मिळणार 31%
▶️महागाई भत्त्यात राज्य सरकारने केली मोठी वाढ..!
▶️ 1 जुलै 2021 पासून पगारात मिळणार वाढ. संपूर्ण आदेश Download करण्यासाठी खाली पहा
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पगार वाढ अपेक्षित होती.केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेंशन धारकांना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता हा 31% लागू झाला आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढवा अशी मागणी संघटनांन मार्फत केली जात होती.तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सूचना किंवा आदेश जशास तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली गेलेली महागाई भत्ता वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणे अपेक्षित होते.आज महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.अखिल भरतील सेवेतील अधिकारी यांना खालील आदेशानुसार 31% Dearness Allowance 1 जुलै 2021 पासून दिला जाणार आहे.
संपूर्ण आदेश वाचा ..
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 1/4/2021-E-II (B), Government of India, Ministry of Finance Department of Expenditure, दिनांक २५.१०.२०२१ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित,
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०७.२०२१ पासून लागू करण्यात आलेला ३ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०७.२०२१ पासून ३१% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२११२०२११४१०८०००७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
3 Comments
गोड बातमी..
ReplyDeleteसकाळच्या प्रहरी...
Lokana bhikela lava ani gov sarvant la majet rahudya
ReplyDeleteराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कधी लागू करणार महोदय,
ReplyDelete