आता करा चेक 12 विचा निकाल घरी बसून मोबाईल वर फक्त 1 मिनिटात.! #HSCRESULT2025|| #How_To_Check_HSC_Result_2025_On_Mobile
राज्यातील बारावीचा निकाल आज दिनांक 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 मेपासून त्यांच्या महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व १२ वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या निकाल साठी खूप खूप शुभेच्छा.आज दुपारी ठीक 1 वाजता परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या WEBSITE वर १२ विचा निकाल घोषित होणार आहे.आजचा निकाल सहज घरी बसून MOBILE वर पाहता यावा करिता काही लिंक खाली दिलेल्या आहेत.त्या लिंक वर क्लिक करून आपण सहज कोणाचाही निकाल पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. आता परीक्षेच्या निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्याचा बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.
आपला निकाल पाहण्यासाठी जवळपास 10 WEBSITE च्या लिंक खालील दिलेल्या आहेत, कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.अडचण आल्यास किंवा RESULT पाहता ण आल्यास आम्हाला नंबर COMMENT मध्ये सांगा आम्ही मदत करू.
निकाल कसा पाहायचा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे त्या वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
- दरम्यान, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
0 Comments