▶️वाचा खालील कोणत्या मागण्या होणार पूर्ण..!
▶️संपूर्ण बातमी खाली वाचा.
मा. मुख्यसचिवांची महासंघाच्या पदाधिका-या समवेत प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांच्या दालनात आज बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वच प्रलंबित समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार मा. मुख्यसचिवांनी
१) मा. बक्षी समितीच्या वेतनत्रुटीबाबतच्या खंड २ अहवाल तातडीने सादर करण्यासंदर्भात अ.मु.स. वित्त यांना सुचना केल्या आहेत.
२) अधिका-यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय जानेवारी २०२० पासूनच पुर्वलक्षी प्रभावाने जारी करण्यात येईल.
३) शासकीय सेवेत कार्यरत पती-पत्नी एकत्रित ठेवण्याच्या धोरणानुसार, महसूल विभाग वाटप नियम, २०२१ च्या अधिसूचनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याविषयी सामान्य प्रशासन विभागास निर्देश देण्यात आले.
४) सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करणेबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन शासकीय धोरण ठरविण्यात येईल.
५) सातवा वेतन आयोग थकबाकीच्या तिस-या हप्त्याचे प्रदान, जुलै ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीतील ५% दराने ५ महिन्यांची थकबाकी तसेच दि. १ जुलै, २०२१ पासून केंद्राप्रमाणे ११% वाढीव महागाई भत्ता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केले.
६) विविध खात्यांतील रखडलेल्या बढती प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत सर्व विभागांना सुचना केल्या जातील.
७) महिला अधिकारी-कर्मचा-यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व विभागांना सुचना केल्या जातील.
८) राज्यात वर्ष २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्वांना केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सर्व सुविधा लागू करण्याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल. आदि विषयांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले आहे. सदर बैठकीस मुख्यसचिव कार्यालयातील सहसचिव श्री. रणजित कुमार तसेच महासंघाचे मुख्य सल्लागार, मा. ग. दि. कुलथे, महासंघाचे अध्यक्ष, श्री. विनोद देसाई, उपाध्यक्ष श्री. विष्णू फटांगरे-पाटील उपस्थित होते.
27 Comments
घरभाडे भत्ता केद्रीय प्रमाणात असावा
ReplyDeleteI agree, there should not be any discrimination. The D.A. should be implemented alongside the Central Government at the same time.
Deleteआता कोणतेही वय वाढवू नका बेरोजगार मूले इतक्या पगारात 3 मूले संगणकावर जोरात काम करतील जे जूने आहेत त्याना भ्रष्टाचार कसा करावा हे माहीत आहे ऊलट या अधिकारी यांची चोकशी ई. डी. मार्फत लावा लाच घेणारयाना कायमचे सेवा मुक्त करा तरच वचक राहील कोणतेही भत्ता देवु नका नाहीतर बेरोजगार जनता माफ करणार नाही
ReplyDeleteऊलट वय कमी करा कर्म चारी व लेडीज तर अजिबात काम करत नाही देवाण घेवाण करताना जनतेला अडचणीत आणतात
ReplyDeleteलेडीज 100%काम करतात पुरूष कामचुकार वेळ काडु असतात कार्यलत बायोमॅट्रीक केले की चहा टपरीवर लेडीज मनलाऊन काम करतात जनतेला शासकीय माहीती देतात सेवा करतात
ReplyDeleteमॅडम लेडीज काय काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे
Deleteमॅडम आपण म्हटल्याप्रमाने,
Deleteबायोमेट्रिक केले की लेडीज चहा टपरीवर मन लावून काम करतात ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
कृपया महिलांनी सदर कृतीत सुधारणा करून प्रशासकीय कामे करावीत.
वयोमर्यादा वाढवू नका . क्लार्क पदाला ग्रेड पे अत्यंत कमी आहे तो २८०० कमीत कमी करा
ReplyDeleteAgadi brobr, clerk bharti honyasathi graduate lagate, tya pramane vetan nko ka
Deleteवयमार्यादा वाढ ऊ नये यामुळे रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात.
ReplyDeleteवय मर्यादा वाढवू नये या मुळे रोजगार उपलब्ध होणार नाही
ReplyDeleteलिपिक टंकलेखक या संवर्गा तील कर्मचाऱ्यांना बक्षी कमिटी ने प्रस्तावित केल्याप्रमाणे2400 ग्रेड पे लागू करा.
ReplyDeleteकेंद्र शासनाचे निवृती चे वय ६० वर्षे असलेने राज्य शासनाची मागणी तिच आहे . कर्मचान्या मध्ये भाव भोद नको . एकतर केंद्र शासनाचे कर्मचाऱ्याचे वय ५८ वर्षे करावे किंवा राज्य शासकीय कर्मचार्यांचे वय ६० वर्षे करावे . बेरोजगारीचा प्रश्न केंद्रशासना चे कर्मचार्यां चे वय ६० असतांना कसा सुटू शकतो ?
ReplyDeleteवर्ग 4 कर्मचारी याच्या पगाराबद्दल पण बघा थोडे
ReplyDeleteराज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृती वय ५५ वर्षे करावे जेणेकरून तरूण बेरोजगार लोकांना नोकरी मिळेल. बेरोजगारी कमी होईल.
ReplyDeleteSaheb he Sagal GPF karmacharyasathi pan mazyasarkhya ushira nokarila laglelya karmcharyache kay honar. Me vayachya 41 varshi nokarila lagalo mazhi seva jar 58 asel tar 17 varsh. Me kay karave. Je kahi GR nirnay hotat te Fakt ni Fakt tyanchya fayadyache. Are amhi kay gunja kelay ki 2005 nantar nokarila laghalo. Amhala pention nahi,graduate nahi,pF nahi amhi retaire zhalyawar jagayache kashe. Amchech DCPS rupay jama kelele paise amhala 60 takke amhala denar urlele 40 takkevar amahala amchyach paishyatun pention denar ti sudha 1000 kinva 1200 chya kaval pass yenar mag pudhe amhi retire zalyavar kase jagave???????????????????? ????? Calculation of GPF & DCPS GPF( Graduati 1000000 te 1500000, Fund 2500000 te 3000000, Raja rokhikaran- 1000000 te 1500000, Gis- 100000 chya pudhe ) ashi bhali mothi rakkam tasech pention javal pass 35000 chya pudhe. DCPS karmachi garaduti- nahi Fund-nahi Fakt Raja rokhikaran and his rakaam Molnar ripan Javalpass doni milun 500000/- DCPS karmchachri retire zalyavar Fakt 500000 rupaye ghenar to tya madhe kay kay karanar mulancha lagna tyanche shikashan kase karanar . Sanga 58 varsha nantar tyala kudhe tari kamala jave lagnar . Shasanane jara tari DCPS karmcharyache vichar karava.
ReplyDeleteWhat about pension pl. Immediately apply
ReplyDeleteसेवानिवृत्तीचे वय अजिबात वाढवून देण्याचा विचार करु नये, उलट कमी करता येईल का ते बघावे. पेन्शन धारकांचा विचार करावा.
ReplyDeleteकमी नाही करत तुमलाच कामा वरून काढून टाकतो
Deleteवय 60 करा
ReplyDeleteआजकाल शिक्षण घेण्यासाठी खुप वेळ लागतो त्या मुळे त्या माणसाची नौकरी तितकी होत नाही त्यामूळे वय 60 वर्षे पाहीजे
ReplyDeleteRetirement age should be either 50 or 55 years because for most of the people physical health goes on getting deteriorated after the age of 50 years. It should be applicable to the lecturers, HODd, Principals alike. Teaching posts' salaries are reasonably very high. That puts on heavy financial overhead on the Government. It should be dropped down to 50%. Lecturers should not be in the Class - I cadre.
ReplyDeleteआपल्या मुलांचा विचार करता वय मर्यादा वाढविणे चुकीचे आहे बेकारी वाढेल
ReplyDeleteIts not at all good. Retirement age should not b increased. We should think selflessly. See the mob waiting for job. Let our youngsters get the job.
ReplyDeleteसेवानिवृतीचे वय 60 करावे. कारण बरेच जण उशिरा नोकरीला लागलेले आहेत. त्यामुळे नोकरीचे वय केंद्र शासना प्रमाणे 60 वर्ष करावे.
ReplyDeleteकोरोना ने सर्व जगाला १० वर्ष मागे नेले आहे,
ReplyDelete२वर्ष कर्मचार्यांना मिळाले तर फायदा होईल.
राज्य शासनाचा अजब कारभार. निवृत्तीचे वय गट-अ (अधिकारी) करिता 60 वर्षे, गट-ड करिता 60 वर्षे आणि फक्त गट-क ला 58 वर्षे.
ReplyDelete