राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना धारकांना सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी / सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली याबाबत करावयाची कार्यवाही.NPS COMPENSATION.
राज्य शासनाचा मोठा निर्णय..!
राज्यातील कर्मचार्यांना होणार फायदा.
वाचा संपूर्ण शासन निर्णय आणि करा DOWNLOAD
प्रस्तावना :
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती इ. कारणांमुळे शासन सेवा संपुष्टात आल्यास निवृत्तिवेतन निधी व विनियामक प्राधिकरण यांचे संदर्भ क्र.१ व २ नुसार त्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या त्यांच्या प्रान खात्यावर जमा असलेल्या रकमेचा परतावा (Exits and Withdrawals Under NPS) देण्याचे नियम करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या व शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंशदानाचा परतावा करण्याची तरतूद सदर अधिसूचनेत करण्यात आलेली नव्हती.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या नियम ४५ नुसार जुनी निवृत्तिवेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचान्यास सेवेतून बडतर्फ केल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास, असा कर्मचारी पूर्वीच्या सेवेचा हक्क गमावतो, अशी तरतुद आहे. तथापि, आता केंद्र शासनाने संदर्भ क्र. ३ येथील अधिसूचनेन्वये शासकीय सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त, सेवेतून काढून टाकलेल्या, बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रान खात्यामध्ये जमा असलेल्या अंशदानाचा, त्यावरील लाभासह परतावा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तवेतन योजना धारकांना शासकीय सेवेतून सक्तीने सेवानिवृ / सेवेतून काढून टाकणे / बडतर्फी, या प्रकरणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रान खात्यावर जमा असलेल्या अंशदानाचा परतावा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
0 Comments