राज्य सरकारी कर्मचार्यांचे सेवा निवृत्तीवय ६० वर्ष करू नये बाबत महत्वपूर्ण पत्र..!निवृत्तीवय ५८ कायम ठेवण्याची मागणी..! RETIREMENTAGE60

राज्य सरकारी कर्मचार्यांचे सेवा निवृत्तीवय ६० वर्ष करू नये बाबत महत्वपूर्ण पत्र..!निवृत्तीवय ५८ कायम ठेवण्याची मागणी..! RETIREMENTAGE60 

➡️काय संपूर्ण पत्र आहे ते खाली सविस्तर वाचा व ह्या पत्राबद्दल तुमचे मत खाली नोंदवा. 

प्रति,

मा. मुख्य सचिव, 

महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२.

                                     (प्रत विहित मार्गाने सविनय सादर)

विषय:- सेवानिवृत्तीचे वय ५८ कायम ठेवण्याबाबत.

आदरणीय महोदय,

सद्य:स्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय ५८ आहे. सदर वयोमर्यादा ५८ ऐवजी ६० करावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रमाण व त्यांना शासकीय सेवेच्या अल्प संधी व त्यामुळे त्यांना येणारे नैराश्य पाहता, याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे उचित वाटत नाही. त्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय ५८ कायम ठेवावे, अशी विनंती मी करीत आहे.

(सतीश का. जोंधळे)

सह सचिव, जलसंपदा विभाग



Reactions

Post a Comment

0 Comments