राज्य सरकारी कर्मचारी व पेंशन धारकांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय..! वित्त विभागाचे पत्रक निर्गमित.अतिप्रदानाची होणार आता वसुली..!द्यावे लागणार वचनपत्र (UNDERTAKING)
▶️राज्य सरकारी कर्मचारी व पेंशन धारकांसाठी धक्कादायक निर्णय.
▶️अतिप्रदानाची केली जाणार आता वसुली.
▶️मिळणाऱ्या थकबाकी मधून केली जाणार वसुली.वित्त विभागाचा मोठा निर्णय.
वाचा सविस्तर खाली व DOWNLOAD करा संपूर्ण पत्रक.
या द्वारे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग / शासकीय कार्यालये / स्थानिक स्वराज्य संस्था / अनुदानित संस्था / स्वायत्त संस्था यांना सुचित करण्यात येते की, कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रसंगी जसे की, वेतननिश्चिती(FIXATION) / वेतनवाढी(INCREMENT) / अथवा इतर कोणत्याही आर्थिक लाभाच्या / प्रदानाच्या अनुषंगाने अतिरिक्त प्रदान झाल्याची बाब भविष्यात शासनाच्या निदर्शनास आल्यास अतिप्रदानित रक्कम शासनास परत करण्याचे वचनपत्र (Undertaking) संबंधित कर्मचाऱ्याकडून त्यांच्या सेवाकालावधीत एकदाच घेण्यात यावे. जे कर्मचारी सद्य:स्थितीत शासन सेवेत आहेत त्यांच्याकडून हे वचनपत्र या परिपत्रकाच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत घेण्यात यावे. तथापि जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्याबाबत तात्काळ त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी घेण्यात यावे. जे कर्मचारी शासन सेवेत नव्याने दाखल / नियुक्त होतील त्यांच्यासंदर्भात हे वचनपत्र नियुक्तीच्या १ महिन्याच्या आत घेण्यात यावे. हे वचनपत्र शासनास विहीत वेळेत भरुन देणे संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना बंधनकारक आहे. सदरचे वचनपत्र संबंधितांनी विहीत कालावधीत न दिल्यास त्यांचे त्यापुढील (विहीत कालावधीनंतरचे वेतन रोखण्याबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी • कार्यवाही करावी. हे वचनपत्र संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्या संपूर्ण सेवा कालावधीसाठी लागू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच हे वचनपत्र घेतल्याबाबतची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी. तसेच सदरचे वचनपत्र सेवापुस्तकात जोडण्यात यावे. सदर कार्यपद्धतीचे पालन करण्याची प्राथमिक जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. सदर कार्यपद्धतीचे पालन न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी योग्य त्या कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी. (वचनपत्राचा नमूना सोबत जोडला आहे.)
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१११२२१३२०५७८३०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
0 Comments