विभागातील सर्व जिल्हा परिषद स्तरावर पेन्शन सेल व पेन्शन अदालत सुरु करणे व मासीक निवृत्तीवेतन वेळेवर अदा करणे बाबत,मा.उपयुक्त यांचे अत्यंत महत्वाचे आदेश..!
▶️पेंशन धारकांसाठी अत्यंत महत्वाचे आदेश..!
▶️ पेंशन वेळेवर मिळण्याचा मार्ग मोकळा..!
संपूर्ण आदेश वाचण्यासाठी खालील पोस्त सविस्तर पहा.आणि आदेश DOWNLOAD करा.
उपरोक्त विषयाचे संदर्भिय निवेदनाव्दारे मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये एक जिल्हा एक निवृत्तीवेतन कक्ष स्थापन करण्यात आले नसल्याबाबत तसेच दर दोन महिन्यानी पेन्शन अदालत आयोजन करण्यात येत नसले विषयी तसेच निवृत्तीवेतनधारकांचे मासीक निवृत्तीवेतन दर महिण्याच्या 5. तारखेपूर्वी अदा करणे व निवृत्तीवेतनधारकांचे प्रलंबित मागणयाबाबत कार्यवाही करणे विषयी विनंती केली आहे.
संदर्भिय पत्रान्वये जिल्हा परिषद स्तरावर पेंन्शन सेल स्थापन करून दर दोन महिन्यांनी पॅन्शन अदालत आयोजित करणे विषयी, जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक निवृत्तीवेतन कक्ष स्थापन करून निवृत्तीवेतनधाकांचे मासीक निवृत्तीवेतन एकाच ठीकाणवरून अदा करणे विषयी तसेच मासीक निवृत्तीवेतन दर महिन्याच्या 5 तारखेपुर्वी अदा करण्याची कार्यवाही करणे विषयी शासन व या या स्तरावरून वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहे. तेव्हा संदर्भिय पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार एक जिल्हा एक निवृत्तीवेतन कक्ष स्थापन करणे, जिल्हा परिषद स्तरावर दर दोन महिन्यांनी पेन्शन अदालत आयोजित करणे, मासीक निवृत्तीवेतन वेळेवर अदा करणे तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंतबित मागण्याचे निराकरण करण्याची कार्यवाही विनाविलंब करणे विषयी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे, ही विनंती.
(सुरेश बेदमुथा)
उप आयुक्त (आस्थापना)
विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद
0 Comments