डिसेंबरचा पगार होणार लवकरच..! जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कार्म्चार्यानासाठी आनंदाची बातमी..!DECEMBERSALARY
▶️पगारासाठीची प्रतीक्षा संपणार..!
▶️जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध..!
▶️पगार संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे आदेश.
महिना भर काम केल्यानंतर अपेक्षा असती ती वेळेवर पगार होण्याची.परंतु बर्याच वेळा अनुदान उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना पगारासाठी बर्याच वेळा वाट पहावी लागते.नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे परंतु अद्याप जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा डिसेंबर चा पगार नसल्याने ,पगाराची आतुरता कर्मचार्यांना लागली आहे. परंतु पगाराची वाट पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कार्म्चार्यानासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतानासाठीअनुदान वितरीत
करण्यात आले आहे.सदरील अनुदान राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना वितरीत करणे संदर्भात मा उपसंचालक यांचे आदेश सुद्धा निर्गमित झाले आहे,सदरील आदेशाने डिसेंबर महिन्याचा पगार लवकरच होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.सदरील आदेश वाचाण्यासातही खाली पाहावे.
0 Comments