खुशखबर..!राज्य शासनाचा मोठा निर्णय..!राज्यातील "त्या" कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आता 34% मिळणार..! Dearness Allowance Increased
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आता कर्मचार्यांना 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता 3% वाढवून दिला जाणार आहे.केंद्र सरकारने या आधी 31 मार्च 2022 रोजी आदेश निर्गमित करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% असा केला होता.आता केंद्राच्या 31 मार्च 2022 रोजी निर्गमित झालेल्या ज्ञापणानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता 34% दिला जाणार आहे. संपूर्ण आदेश काय आहेत ह्या करिता खालील माहिती संपूर्ण वाचा..
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 1/2/2022-E-II (B), Government of India, Ministry of Finance Department of Expenditure, दिनांक ३१.०३.२०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२२ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०१.२०२२ पासून ३४% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
0 Comments