गुड न्युज।।सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची तिसरा हफ्ता रोखीने मिळणार..! Satva vetan ayog Arrears

गुड न्युज।।सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची तिसरा हफ्ता रोखीने मिळणार..! Satva vetan ayog Arrears


शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी.


(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. (ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. (क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

वरील (ब) आणि (क) मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत (i) भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.


(ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून, २०२१ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेवर दिनांक १ जुलै, २०२१ पासून व्याज अनुज्ञेय राहील.


३. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली तिसऱ्या हप्त्याची रक्कम दिनांक १ जुलै, २०२१ पासून २ वर्ष म्हणजे दिनांक ३० जून, २०२३ पर्यंत काढता येणार नाही.


४. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक १ ते ५ येथील शासन आदेशांतील अन्य तरतूदींचे अनुपालन करण्यात यावे. 


५. सदर शासन निर्णय वित्त विभाग/सेवा- ४ कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २४अ / २०२२/सेवा-४, दिनांक २३/२/२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०५०९१५०१०१७६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.





Reactions

Post a Comment

0 Comments