सातवा वेतन आयोगाच्या थकबाकी माघील सर्व हफ्ते आता मिळणार फेब्रुवारीच्या वेतनात..! उप-संचालक यांचे महत्वाचे आदेश।। Seventh Pay Commission ARREARS
◼️सरकारी कर्मचार्यांना दिलासा देणारे आदेश..!
◼️फेब्रुवारीच्या नियमित वेतनासोबत आता मिळणार महागाई भत्ता थकबाक DEARNESS ALLOWANCE ARREARS आणि सातवा वेतन आयोग थकबाकी हफ्ते.
◼️कोणत्या कर्मचार्यांना सदरील आदेशाचा फायदा होणार आहे,त्यासाठी खालील संपूर्ण माहिती वाचावी.
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सर्व
२) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) सर्व
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये कळविण्यात येते की, शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतूदीनुसार व दिनांक १०/०२/२०२३ रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार पुढील लेखाशीर्षामध्ये माहे फेब्रुवारी २०२३ च्या वेतन व सातवा वेतन आयोगाचा राहीलेला पहिला, दुसरा हप्ता तसेच तिस-या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याचे दिसून येत असून त्यानुसार माहे फेब्रुवारी २०२३ चे वेतन देयकामध्ये लेखाशीर्ष - २२०२०५५८, २२०२१९०१, २२०२एच९७३, २२०२१९४८, २२०२०५११, २२०२०५७६, २२०२०५४९, २२०२०५३१ ची देयके ऑनलाईन महागाई भत्त्यासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता काढण्यात यावा.
तसेच लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०४६९ व २२०२०५०२ या लेखाशीर्षामध्ये दि. १०/०२/२०२३ रोजीच्या बैठकीतील आढाव्यानुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन काढणे पर्याप्त तरतूदीअभावी शक्य नसल्याने फक्त फेब्रुवारी २०२३ नियमित वेतन देयक व महागाई भत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचा-यांचे नियमित वेतन काढण्यात यावे. त्यानंतर उर्वरित रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. ०१/०२/२०२३ नुसार ऑफलाईन काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. व नंतर त्याची शालार्थ प्रणालीमध्ये नोंद घेण्यात यावी. तसेच उपलब्ध तरतूद १०० टक्के खर्च होईल, याची दक्षता घ्यावी.
0 Comments