सरकारी कर्मचाऱ्यांचा महागी भत्ता अखेर ११% वाढला..!
▶️राज्य शासनाचा मोठा निर्णय..!
▶️सरकारी कर्मचाऱ्यांचा महागी भत्ता अखेर ११% वाढला..!
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 1/1/2020-E-II (B), Government of India, Ministry of Finance Department of Expenditure, दिनांक २०.०७.२०२१ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०७.२०२१ •पासून लागू करण्यात आलेला ११ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०७.२०२१ पासून २८% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०७२९१३१६४३६२०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
0 Comments