वेतन पडताळणी मार्गदर्शिका || PAY VERIFICATION BOOK||PAY FIXATION

 राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्वाची पुस्तिका.PAY VERIFICATION BOOK||

➡️प्रत्येक राज्य सरकारी कर्मचार्यांना सदरील माहिती असावी हा दृष्टीकोन .

➡️आता आपल्या सर्वन साठी वेतन पडताळणी मार्गदर्शिका .

➡️खाली वेतन पडताळणी मार्गदर्शिका दिली आहे आपण सहज DOWNLOAD करून घेवू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या वित्तीय संरचनेत संचालनालय, लेखा व कोषागारे महत्वाची भूमिका पार पाडतात. संचालनालय, लेखा व कोषागारे या कार्यालयाची स्थापना दिनांक १ फेब्रुवारी, १९६२ रोजी झाली आहे. संचालक, लेखा व कोषागारे यांच्या अधिनस्त वेतनपडताळणी पथकांकडून सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनाची पडताळणी केली जाते. विभागीय स्तरावरील वेतन पडताळणी पथक हे संचालक, लेखा व कोषागारे यांच्या नियंत्रणाखाली आहे.

महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनांप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता विभागनिहाय वेतन पडताळणी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. दिनांक ०१ जानेवारी, १९८६ पासून अंमलात आलेल्या सुधारीत वेतनश्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती केल्यानंतर अशी वेतनिश्चितीची पडताळणी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपूर १२८९/प्र.क्र.२५/सेवा-१०, दिनांक २२/१२/१९८९ नुसार संचालक, लेखा व कोषागारे यांच्या आस्थापनेवर, मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी प्रत्येकी १ वेतन पडताळणी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तदनंतर शासन निर्णय क्र. संकीर्ण १००९/प्र.क. १६९/सेवा-९, दिनांक ०६/११/२००९ अन्वये वेतन पडताळणी पथकांची निर्मिती व पुनर्जीवन करण्यात येऊन सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात विभागीय स्तरावर मुंबई, कोकण भवन, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर अशी सात वेतन पडताळणी पथके कार्यरत आहेत. विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी केलेल्या वेतन निश्चितीच्या पडताळणीचे काम शक्य तितक्या लवकर आणि एका विशिष्ट मुदतीमध्ये करावे अशी शासनाची अपेक्षा आहे.

वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करतांना काही त्रुटी/ उणिवा/ अपूर्णता आढळल्यास पथकाकडून आक्षेप उपस्थित केले जातात. सदरहू आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी काही वेळेस संबंधित कार्यालयाकडून बराच कालावधी घेतला जातो. परिणामी अशा प्रकरणांची पडताळणी दिर्घ काळ प्रलंबित राहते.

म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम १२१ ते १२६ नुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांच्या निवृत्तीपूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक वेतनपडताळणी पथकाकडून पडताळणी करुन आवश्यक आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश कार्यालये कर्मचान्याच्या सेवानिवृत्तीला एक किंवा दोन महिने शिल्लक असतांना किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करतात. यास्तव कर्मचा-यांना निवृत्तीवेतन वेळेत मिळत नाही. त्यांची प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे, लोक आयुक्त प्रकरणे व माहितीच्या अधिकारातील प्रकरणे उद्भवतात. वेतन पडताळणी पथकाने निदर्शनास आणलेले आक्षेप/ त्रुटी यांचे वेळीच निराकरण संबंधित कार्यालयाने केल्यास वेतन पडताळणी सुरळीत होवून कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन व भत्ते आणि निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदानाची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन वेळेत मिळणे बाबतची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखांनी घ्यावयाची आहे. असे निदर्शनास आले आहे की, काही कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यापासून वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कार्यालयाने केलेली वेतननिश्चिती वेतन पडताळणी पथकाकडून वेळीच (संबंधित वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये) प्रमाणित करुन घेतलेली नसते. त्यामुळे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी सेवापुस्तक पडताळणीस विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कार्यालयाच्या विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी वेतन आयोगानुसार वेळोवेळी कर्मचाऱ्यांची वेतननिश्चितीची प्रकरणे वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित करुन घेण्याची दक्षता घ्यावी.

वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून वेतनिका ही संगणकीय प्रणाली बनविण्यात आली आहे. वेतन पडताळणी पथकास प्राप्त होणारी दैनंदिन सेवापुस्तके वेतनिका प्रणालीमार्फत स्विकारण्यात येतात. सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर उक्त प्रणालीमार्फत संबंधितांचा सेवार्थ ID / सेवापुस्तक ID चा वापर करुन आहरण व संवितरण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यालाही सेवापुस्तकाची सद्यस्थिती पाहता येते. सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक, सेवापुस्तक प्रलंबित प्रमाणित/आक्षेप यांची माहिती मिळते. तसेच वेतन पडताळणी पथकाकडून सेवापुस्तक पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती, वेतनिका प्रणालीत सेवापुस्तक प्रविष्ट करतेवेळी संबंधित कार्यालयानी नोंदविलेल्या मोबाईल क्रमाकांवर SMS व्दारे प्राप्त होते. सेवापुस्तकास आक्षेप असल्यास त्या आक्षेपास अनुसरून महत्वाच्या अभिलेखांची किंवा सेवापुस्तकातील नोंदींची पूर्तता संबंधित कार्यालयास करणे सुलभ होते व वेतन पडताळणीचे कामही जलद गतीने होण्यास मदत होते. दर सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचान्याचा अचूक मोबाईल क्रमांक प्रणाली मध्ये नोंदवणे आवश्यक आहे. वेतन पडताळणी पथकाचे काम हे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके, संबंधित विभागाची परिपत्रके व महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियमानुसार करण्यात येते. सेवापुस्तकांना लागणाऱ्या आक्षेपांची संख्या कमी व्हावी व यासाठी काही उपाय योजना व्हाव्यात म्हणून "वेतन पडताळणी मार्गदर्शिका" ही पुस्तिका प्रसिध्द करण्यात येत आहे. या पुस्तिकेच्या प्रसिध्दी नंतर शासकीय आदेशानुसार काही नियमात बदल करण्यात आल्यास ते विचारात घेऊन या पुस्तकाचे अद्ययावतीकरण/ सुलभीकरण करुन प्रसिध्द करण्यात येईल. सदरची पुस्तिका विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी यांना उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments