राज्यातील सर्व पेंशन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी मा.संचालक यांचे अत्यंत महत्वाचे पत्रक निर्गमित झाले आहे.
▶️तुम्ही जर पेंशन धारक असाल तर नक्की वाचा.
▶️जर तुम्ही दर महिन्याला तुमची पेंशन उचलत नसाल तर,तुमची पेंशन कोषागार कार्यालयाला(TREASURY OFFICE) परत केली जाईल का..?
▶️मा.संचालक यांचे या संदर्भातील महत्वाचे पत्रक..!
▶️आदेश DOWNLOAD करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
वाचा खाली सविस्तर..
विषय:- मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ निवृत्तीवेतनाची (PENSION)उचल केलेली नाही अशा निवृत्तीवेतनधारकांच्या बाबत कार्यवाही करणेबाबत.
संदर्भ:- १. पत्र क्र. कोषा/नाग/नि.वे./कावि/९९/२६३५/२०२१ दि. ३०/०६/२०२१. २. वित्त विभाग शासन निर्णय क्र. टीआरडब्ल्यू १३८६ / ९९६ / सीआर ६५/८६/प्रशा-९, दि.०८/०५/८६
नागपूर कोषागार कार्यालय यांनी उपरोक्त संदर्भ क्र. १ मधील दि. ३०/०६/२०२१ च्या पत्राद्वारे ज्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ निवृत्तीवेतनाची उचल केलेली नाही अशा निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये असलेली संपूर्ण जमा रक्कम परत करण्याबाबत नागपूर येथील बँकांना सूचना दिल्या आहेत. सदर पत्रामध्ये महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्र. ३५८ व ३६० याचा उल्लेख करून ज्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी मागील सहा महिन्यापेक्षा अधिक काळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन याची उचल केलेली नाही अशा निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये असलेली संपूर्ण रक्कम वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या नावे धनाकर्षाद्वारे (CHEQUE)पाठविण्याबाबत सूचित केले आहे.
वित्त विभाग शासन निर्णय क्र. टीआरडब्ल्यू १३८६/ ९९६/ सीआर ६५/८६/प्रशा-९, दि.०८/०५/८६ अन्वये कोषागार अधिकारी / अधिदान व लेखा अधि यांनी प्रत्येक वर्षी दर सहा महिन्यांनी बँकेकडे पाठपुरावा करुन ज्या निवृत्तीवेतनधारकांनी सहा महिन्यात बँकेतून निवृत्तीवेतन काढले नाही अशा निवृत्तीवेतनधारकांची यादी जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे तसेच कोषागार अधिकारी यांनी त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक होते. संबंधित बँकांनी विहित कालावधीत माहिती प्राप्त करून न दिल्यास त्या बँकेकडे त्याचा पाठपुरावा करावयाचा अशी तरतूद करण्यात आली होती.
मात्र महाराष्ट्र कोषागार ( तिसरी सुधारणा) नियम १९९६ नुसार नियम क्र. ३५८ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे शासन अन्यथा निदेश देईल त्याशिवाय भारतात देय असणारे निवृत्तीवेतन १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता घेण्यात आलेले नसेल तर संवितरण अधिका-यांकडून ते देय असण्याचे बंद होईल.
वित्त विभाग शासन निर्णय क्र.निवेयो-१००७/प्र.क्र.१२०/ कोषा प्र-५ दि. १८/०८/२००८ मधील मुददा क्र. २५ नुसार प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात (किंवा अपवादात्मक परिस्थितीत शासन निर्देश देईल त्या महिन्यात निवृत्तीवेतनधारकांकडून हयातीचा दाखला स्विकृत केला जातो. ज्या निवृत्तीवेतनधारकांचा हयातीचा दाखला विहित कालावधीमध्ये प्राप्त होत नाही, अशा निवृत्तीवेतनधारकाचे मासिक निवृत्तीवेतन प्रदान करणे थांबवण्यात येते...
याशिवाय, निवृत्तीवेतनधारकांच्या किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यू नंतर त्यांच्या खाती असलेली अतिप्रदानाची रक्कम निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामधून कोषागारांकडून धनाकर्षाद्वारे बँकाकडून परत घेण्यात येते.
वरील प्रचलित नियम व शासन निर्णयात तरतुदी स्पष्ट असतानाही कोषागार कार्यालय,नागपूर यांनी बँकाना धनाकर्षाद्वारे रक्कम परत करणेबाबत सूचित केले आहे. अशाप्रकारे चुकीच्या कार्यवाहीबाबत बँकांना पत्र निर्गमित झाल्याने निवृत्तीवेतनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
सबब, यासंदर्भात आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या अधिनस्त असलेल्या कोषागार कार्यालय, नागपूर यांनी त्यांचे दि. ३०/०६/२०२१ चे पत्र रद्द करण्यात येत असल्याबाबत बँकांना त्वरीत कळवावे, असे निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत. तसेच कोषागार अधिकारी यांना उपरोक्त नमूद प्रचलित नियम व शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन कार्यवाही करणेबाबत सूचित करावे.
1 Comments
काही तरी बचत करावी हा हेतू ठेऊन जर पैसज जमवले तरीही जमणार नाही का?
ReplyDelete