राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सातवा वेतन आयोग थकबाकीची 4 था हफ्ता जून च्या पगारासोबत..! 7th Pay commssion Fourth Installment
▶️राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ..!
▶️सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकीची चौथा हफ्ता.
वाचा संपूर्ण पोस्ट व करा Download संपूर्ण शासन आदेश....
शासन अधिसूचना वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे, २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
महागाई भत्ता 42% झाल्यास तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे हे चेक करण्यासाठी क्लिक करा
तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी २०१९ आणि दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.
राज्यात कोविड १९ (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक ०९ मे, २०२२ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक ०९ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरीत हप्त्यांच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
1 Comments
घरबसल्या विश्वासपूर्ण माहिती देऊन आपण वरीष्ठ सेवानिवृत्त लोकांना दिलासा दिला आहे त्याबद्दल धन्यवाद
ReplyDelete