महागाई भत्ता थकबाकी मार्च पगारात..!११% प्रमाणे मिळणार ३ महिन्याची थकबाकी..! सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी..!DAARREARS
राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.बऱ्याच दिवसापासून थकीत असलेला महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.आज महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
तुम्हाला कश्या पद्धतीने महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे त्यासाठी खालील संपूर्ण शासन निर्णय वाचा.
शासन निर्णय समक्रमांक, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२१ अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै, २०२१ पासून १७% वरुन २८% असा सुधारित करण्यात येऊन दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या सुधारणेनुसार दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील अनुज्ञेय थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.
२. शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील ११% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
0 Comments