आनंदाची बातमी ..!महागाई भत्ता अखेर वाढला..!आता ३१% महागाई भत्ता थकबाकी सह मार्च पगारात मिळणार..! FINALLY DA INCREASED

आनंदाची बातमी ..!महागाई भत्ता अखेर वाढला..!आता ३१% महागाई भत्ता थकबाकी सह मार्च पगारात मिळणार..! FINALLY DA INCREASED 

राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.बऱ्याच दिवसापासून थकीत असलेला महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.आज महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
तुम्हाला कश्या पद्धतीने महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे त्यासाठी खालील संपूर्ण शासन निर्णय वाचा.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२.शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित
वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात यावा. सदर
महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.


               


Reactions

Post a Comment

0 Comments