सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होण्याचा मार्ग मोकळा..!पगार / अनुदान संदर्भात वित्त विभागाचा मोठा निर्णय..! Good News
राज्य सरकारी कर्मचार्यांनाचा पगार वेळेवर व्हावी ही मागणी बऱ्याच वर्षांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत.कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न झाल्याने कर्मचार्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना वेळेवर वेतन मिळावे करिता शासन/प्रशासन दरबारी आपली मागणी मांडत असतात.परंतु बऱ्याच वेळा वेतनासाठी अनुदान उपलब्ध असून सुद्धा मूळ शाईची प्रत उपलब्ध नसल्याने सरकारी कर्मचार्यांना पगारासाठी वाट पहावी लागत होती.
आज वित्त विभागाचे एक परिपत्रक निर्गमित झाले आहे ,ज्यात आता मूळ शाईच्या प्रतिशीवाय डिजिटल शाईच्या प्रतिने सुद्धा कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा अनुदान वाटप केले जाणार आहे.ह्या आदेशाने राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.सोबतच इतर ही विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेवर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
संपूर्ण आदेश वाचण्यासाठी खाली परिपत्रक Download करून घ्यावे.
0 Comments