खुशखबर..!राज्य शासकीय कर्मचार्यांना मिळणार ३४% महागाई भत्ता..!मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. DEARNESS ALLOWANCE INCREASED BY 3%

खुशखबर..!राज्य शासकीय कर्मचार्यांना मिळणार ३४% महागाई भत्ता..!मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. DEARNESS ALLOWANCE INCREASED BY 3%

मुंबई, 16 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील या नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढेत तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली.
वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल. पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. 




Reactions

Post a Comment

0 Comments